बुधवार, ११ डिसेंबर, २०१३

समलैंगिक संबंध हा गुन्हाच?????????

 

      समलैंगिक संबंध हा गुन्हाच - समलैंगिक संबंध कायदेशीर ठरविण्याचा दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरवत सर्वोच्च न्यायालयाने भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ३७७ नुसार, समलैंगिक संबंध बेकायदा असून तो दखलपात्र गुन्हाच असल्याचे बुधवारी स्पष्ट केले. हा गुन्हा सिद्ध झाल्यास जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे समलैंगिक संबंधांचे सर्मथन करणार्‍यांना मोठा धक्का बसला आहे.

ऑस्ट्रेलियातही समलिंगी विवाह रद्दबातल…………………………आणि  बरेच काही ……। 

      सगळीकडुन कोंडी झालेल्या जीवापुढे पुन्हा तोच प्रश्न पडलाय …………………….

 मी कोण ?

आई बाबा तुमच्या वंशाचा दिवा म्हणून
किती लाड केलेत माझे
बंदूक घोडा सगळे आणून दिलेत मला
पण मी मात्र नेहमी बाहुलीतच रमलो 
  
तारुण्याच्या उंबरठ्यावर मिसरूड फुटले  
पण हे काय माझे मन आतून वेगळेच मोहरले
मर्दमित्रा,चिकण्या शब्दांनी मित्रांनी स्पर्श केला कि
वेगळीच अनुभती अंतरंगात उमटायची 


मी कोण मी कोण हे काय मन आक्रांदायच
कुणाशी बोलू कुणाला सांगू
देवा मनाचा अन शरीराचा ताळमेळच बसत नाही
जीवन हवंय पण हे शरीर का नकोय


जग वेगळं पण स्वप्न वेगळीच पडायची
भास आभासाच्या दुनियेत मी एकटाच फिरायचो
कसलं वादळ  कसलं काहूर माजलं?
कोण सांगेलकोण समजावेल  


अन एक दिवस जहर ओतलं  मित्रांनी
काय रे नामर्द आहेस का
मी काय ऐकतोयमी कोण आहे
वावटळीत मी एकटाच भिरभिरतोय    


अन एक दिवस समजले  
निसर्गाने चूक केली  
विज्ञानाने त्याला केमिकल लोच्या म्हटलं 
बाईचं मन पुरुषाच्या शरीरात अडकवलं    


देवा जीवन तर मला जगायचेय  
पण मी कोण माझे अस्तित्व काय
माझा जन्म कशासाठी 
मी कुणासाठी  अन कोण माझ्यासाठी   


किड्या मुंगीच्याही जीवनात काही अर्थ असतो  
गुन्हा केला तरी सजेनंतर गुन्हा माफ असतो  
पण मी काय गुन्हा केलाय
माझ्या जीवनाचा सारीपाट कसा आवरणार  


मानसा तू तर असे नियम बनवलेत कि  
मी कुठेच  बसत नाही  
अरे जनगणनेतहि आम्ही खूप झगडलो तेव्हा
इतर म्हणून तरी आलो    


नोकरीतही मला आरक्षण नाही  
तिथेही फक्त तो अन तीच      
जगण्याचे सगळे रस्ते तुम्ही बंद केलेत 
तरीही तुम्ही मात्र मानव मग मी कोण?   


मी कोण या वावटळीत 
सगळं गणगोत मित्र परिवार दूर झाला 
काल पर्यंतच्या ओळखीच्या नजराही 
आता परक्या झाल्या ...........परक्या झाल्या ..




.. 

गुरुवार, ५ डिसेंबर, २०१३

अगतिकता ……….

           जीवनात मी आजूबाजूला पाहिलेली,कधी कधी स्वतः अनुभवलेली मानवी स्वभावातली, अन परिस्थितीमुळे वाट्यास येणारी अगतिकता ………. 



पाखरं ………… 
            सतरा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे …सत्ताविशीची ती … उमा नाव तिचे अन पदरात दोन गोजिरवाणी मुलं …… अडीच वर्षाची मुलगी अन एक वर्षाचा मुलगा , नवरा सरकारी नोकरीत असूनही घरात खाण्याच्या जीन्नसापुरतेही पैसे देत नव्हता अन ती जगण्याचाच प्रश्न घेऊन मुंबईसारख्या शहरात घरगुती शिकवणी घेऊन जगत होती मुलांसह  अर्धपोटी न कसली हौस न कसला सोस . त्याची मारझोड सहन करत त्याच्याच सोबत एकाच घरात अनोळखी होवून राहत होते दोघे.
          शेजारपाजारचे दया येउन मदत करायचे कधी कधी ……. तिची दया करणारे अन मुलांकडे पाहून मदत करणारे  समाजात बरेचजण होते……. तिच्या मुलांसाठी जीव तुटणारी एक शेजारी…. भावना … बर्याचदा तिच्या मुलांसाठी दुध, खाऊ तिच्या मुलांचे जुने कपडे असे नेहमीच देत राहायची कारण तिला उमाचे खरे बोलणे खूप आवडायचे . अन माझ्या मुलांनी शिकले पाहिजे हे तिचे तळमळीचे बोलणे तिच्या मनाला भावुन जायचे . 
              दरम्यान भावना  त्याच शहरात पण दुसरीकडे राहायला गेली  कधीतरी अधीमधी भेट झाली तर हाय ,हलो कसे चाललेय वगैरे जुजबी बोलणे व्हायचे … उमाची घरगुती शिकवणी बरी चालायची त्यामुळे त्यांचे ठीक चाललेय म्हणायची.
             अन  एक दिवस  उमा  तिच्या जुन्या शेजारणीच्या भावनाच्या घरी गेली दोन्ही मुलांना घेऊन पुन्हा तोच जगण्याचाच प्रश्न…. आता तर नवरा बाहेरख्याली वागतो अन हे घर सोडून जा म्हणून खूप मारझोडही करतो सांगत .  आता उमाची मुलगी दहावीत होती तिची अन मुलगा आठवीत …. तो पर्यंत दोघीही चाळीशीला आल्या होत्या भावना  थोडी हिम्मताबाज  झाली होती  आपले हक्क मिळवणारी अन हि तशीच रडकी … भावना म्हणाली रडू नकोस तुझा हक्क तुला मिळालाच पाहिजे … घर तुझेही आहे . तुला तो काढू शकत नाही … पंधरा वर्षांपेक्षा तू जास्त त्रास सहन केलास आता बस. तेव्हा तिने सांगितले तिने याआधी पुलिस केस केली  होती बर्याचदा नातेवाईकांसोबत  बैठक बसवली पण नवरा घरात पैसे देतच नाही . दोन वकीलांना प्रकरण सांगितले पण पैसे नसल्यामुळे कुणीही दखल घेत नाहीत .मग भावनाने तिच्या दुसर्या वकील मैत्रीणीकडे तिला नेले अन कोर्टातून  उमाला अन मुलांना ३५००/- रुपये दरमहा खावटी सुरु झाली अन घरावर ताबाही . 
                आता वाटले झाले एकदाचे  आता तरी उमा अन मुले सुखी होतील  पण अशीच  आली पुन्हा धुमकेतू सारखी आता बापाची जागा पोरगी चालवतेय म्हणत रडत . कार्टी  लफड्यात पडलीय मी काय काय करू ?   मावस बहिणीच्या सांगण्यावरून पोरीला पोलिसांकडेही नेले . भावना  तिला ओरडलीच अगं नवर्यासाठी  पोलिसात  जाने अन १७  वर्षांच्या मुलीला पोलिसांपुढे उभे करणे  वेगळे . ते पोलिस चांगले होते त्यामुळे त्यांनी  चार समजुतीच्या गोष्टी सांगुन सोडले अन्यथा त्या मुलीला त्रास झाला  असता तर मग  कुणाला दोष दिला असता . यापुढे मुलीशी मैत्रिणीसारखी रहा आता तूच आई अन बापही आहेस . त्यानंतर आता सारे सुरळीत चालू आहे. उमाही आधीमध्ये सांगायची कि आता माझे शिकवणी वर्ग ठीक चाललेत म्हणून अन  मुलगी/मुलगा दोघेही एका दवाखान्यात रीसेप्सनिष्टचे काम करतात मुलगी  झाडू-पोचा व  व  रीसेप्सनिष्टचे कामही करते . सकाळी कॉलेजही करते.
              दरम्यान उमा अन तिच्या मुलीशी बोलुन  काही गोष्टी समजल्या कि मुलांचे तिचे बाबा त्यांच्या लग्नाच्यावेळी खूप खुश होते त्यांनी लग्नापूर्वीच घर घेतले होते अन घरात सगळे सामानही पण नंतर दोघांचे बिनसत गेले अन आई सतत बडबड करत असते त्यामुळे बाबा मारतात तरीही ती गप्प बसत नाही अन समोरच्यालाही गप्प बसू देत नाही . सतत भांडण अन बाप  घरात पैसे न देऊन सगळ्यांची कोंडी करतोय .  या  सगळ्या बाबींमुळे घरात सतत सगळ्यांना मनस्ताप .पण दोघेही म्हणतात मीच बरोबर.
              आठ दिवसांपुर्वी ती मुलीला घेऊन पुन्हा आली कि कार्टी  लफड्यात पडलीय……अन हे तिने सगळ्या चाळीत सांगितले ओळखीच्यानही सांगितले …अन याधीही ती एका मुलाशी बोलायाशी म्हणजे आता मुलगि फालतू झाली वगैरे वगैरे. ………  तोंडाचा पट्टा  सुरु होता  कि भावनाचाच जीव घाबरला . ही मुलगी  नकोच घरात हिच्यामुळे आता मला त्रास होतेय  वगैरे वगैरे  अन सारख्या  शिव्या अन  मुलीचे रडणे सुरूच . भावनाने मुलीला चार दिवस स्वतःच्या घरी ठेऊन घेतले पोरीला बापाला फोन करून सगळे सांगायला सांगितले तर तो म्हणतो तुम्ही आधी आईची बाजू घेतलीत आता तुमचा माझा संबंध नाही अन फोन ठेऊन दिला . अन आईही  एक एकाला भेटून पोरीचे पराक्रम सांगत रडत फिरत होती. भावनाने पोरीला प्रेमाने विचारले तर ती म्हणाली काकी मी चुकतेय पण मी निघेन याच्यातून. पण आई  मला सारखी म्हणते कि मी सांगेन तेच ऐकायचे प्रतिप्रश्न करायचा नाही . मी घरातले सगळे काम करते नोकरीही करते अन माझे शिक्षणही मी घेत आहे पण तू बडबड अन मारणे, ओरडणे थांबव. पण आई म्हणते तो नालायक दोन पोरं माझ्या गळ्यात टाकून मजा मारतोय अन ही पोरगी अशी वागतेय . मी काय करावे?
                       आता यात खरा अगतिक कोण? ज्याने हौसेने संसार मांडला अन जोडीदाराशी पटले नाही तर विस्कळीत आयुष्य जगतोय तो कि ज्याने आर्थिक कोंडी केली अन मारहाणही केली त्यामुळे आयुष्यभर रडणारी उमा कि आई बापाच्या भांडणात बालपण हरवलेली , अकाली मोठी झालेली ,बालपणापासून कष्ट करणारी मुले?